प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेळगाव ते जोधपुर अशी खास हॉलिडे स्पेशल रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी बेळगावातील राजस्थानी समाजातर्फे करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना गुरुवारी सादर करण्यात आले.
शहरातील राजस्थानी समाजातर्फे विक्रम राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांना त्यांच्या कार्यालयांमध्ये सदर निवेदन सादर करण्यात आले निवेदनाचा स्वीकार करून मंत्री सुरेश अंगडी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
राजस्थानला जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध असल्या तरी त्यांचे तिकीट मिळणे दुरापास्त असते बेंगलोर हुन निघणाऱ्या या गाड्या बेळगाव मार्गे जात असल्या तरी त्यांचे रिझर्वेशन अर्थात आरक्षण फुल असल्यामुळे जोधपूर्स राजस्थानात अन्यत्र जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. बऱ्याचदा राजस्थानची रेल्वे पकडण्यासाठी बेळगावच्या मंडळींना चक्क मुंबईपर्यंत जावे लागते. विशेष करून सुट्टीच्या मोसमात या गाड्यांचे तिकीट मिळणे अशक्य असते. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव ते जोधपुर अशीच थेट हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडीची सोय केली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन सादर करतेवेळी हेमराज पुरोहित कैलाश पुरोहित, संतोष व्यास, विजय भद्रा, भुराराम चौधरी, भंवरलाल पटेल, सावळाराम, रत्नराम चौधरी आदी राजस्थानी बांधव उपस्थित होते.