महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी पोलीस खात्याच्या वतीने राणी चन्नम्मा पोलीस पथक एका नव्या रूपात नव्या जोशात स्थापन केले आहे. कोणतीही अडचण असल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधून याबाबतची माहिती दिल्यास चन्नम्मा पथक तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे यापुढे समाजकंटकांना चांगलाच जरब बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिस क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारंभाप्रसंगी या पथकाने वास्तवदर्शी प्रात्यक्षिके दाखवून महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार कशा प्रकारे रोखता येईल हे दाखवून दिले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चन्नम्मा पथकाची माहिती देणारे पत्रकाचे अनावरण करण्यात आले.
![Rani channmaa fade](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/02/FB_IMG_1581387751353.jpg)
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत राहणार आहे. महिलांवर अत्याचाराचे वास्तवदर्शी चित्रण पथकाने जीवन केले. निर्भया उनाव, हैदराबाद देशभरात विविध ठिकाणी झालेले महिलांवरील अत्याचार याचे या पथकाने सादरीकरण केले. यावेळी एकच घोषणा देण्यात आल्या.
या पथकात एक पोलीस उपनिरीक्षक चार महिला पोलिसांचा समावेश असणार आहे. पोलीस परेड मैदानावर वास्तव वादी प्रात्यक्षिके दाखवून या पथकाने आपली ताकद दर्शविली आहे.
All the best