बेळगाव ते धारवाड थेट रेल्वे सुरू करा अशी खूप दिवसापासूनची जनतेची मागणी होती.सध्या सुरू असलेल्या रेल्वे सेवेत लोंढा मार्गे धारवाडला जावे लागते.त्यामुळे प्रवासाला तीन तास लागतात.या नव्या थेट मार्गामुळे बेळगावहून धारवाडला एक तासात पोचणे शक्य होणार आहे.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांनी बेळगाव धारवाड मार्गाचे सर्वेक्षण प्राधान्याने केले.
बजेटमध्ये देखील यासाठी हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.बेळगाव ते धारवाड हे रेल्वे मार्गाचे अंतर 90 किमी असणार असून बागेवाडी,एम के हुबळी ,कित्तूर मार्गे ही रेल्वे धावणार आहे.या मार्गावर अकरा स्टेशन असणार असून 988 कोटी रुपये खर्च यासाठी अपेक्षित आहे.
या रेल्वे लाईनला अशी नवीन प्रस्थावित स्टेशन आहेत.धारवाड, कार्याकोप्प,मामीनगट्टी,तेगुर,कित्तुर,हुलीकट्टी,एम के हुबळी,बागेवाडी, कनवीकरविनकोप्प,देसुर बेळगाव
अशी आहेत मुख्य वैशिष्ट्य
90 कि मी लांब
कर्नाटक राज्यातून जाणार
धारवाड व बेळगाव जिल्ह्यातून
कित्तुर,एम के हुबळी बागेवाडी मुख्य स्टेशनस,
140 ब्रिज
मलप्रभा नदीचे मोठे पूल
11 मोठी ब्रिजे
15 रस्ता ब्रिज
71 अंडर ब्रिज