बेळगावातील प्रादेशिक रोजगार मेळाव्यात 162 कंपन्या सहभागी झाल्या आहेत.9500 विविध नोकऱ्या बेरोजगारांना दिल्या जाणार आहेत.सोळा हजारहून अधिक तरुण,तरुणी रोजगार मेळाव्यात सहभागी झाले असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मुलखात घेऊन नोकरी दिली जाईल.रोजगार हवा असणाऱ्या तरुण,तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अवजड उद्योग खात्याचे मंत्री जगदीश शेट्टर यांनी केले.
एस जी बाळेकुंद्री इंजिनियरिंग कॉलेजच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक रोजगार मेळाव्याचे उदघाटन जगदीश शेट्टर यांनी केले.या प्रसंगी ते बोलत होते.नवे उद्योगधंदे सुरू झाले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.यापूर्वी सगळे उद्योगधंदे बंगलोरला होते.पण आता उत्तर कर्नाटकात नवे उद्योगधंदे येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
हुबळी येथे झालेल्या गुंतवणूकदार मेळाव्यात उपस्थित उद्योजकांनी 72 हजार कोटींची गुंतवणूक उत्तर कर्नाटकात करण्याचे आश्वासन दिले आहे.बेळगाव जिल्ह्यात देखील दहा उद्योजकांनी दहा हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून शक्य तितक्या लवकर कागदपत्रांची पूर्तता करू न नवे उद्योग सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही शेट्टर म्हणाले.
यावेळी मंत्री शशिकला जोलले,जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी,पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार, जिल्हा पंचायत सी ई ओ राजेन्द्र, आमदार अनिल बेनके,अभय पाटील,खासदार अण्णासाहेब जोलले आदी उपस्थित होते.
बेरोजगार युवकांची अशी झाली गर्दी-पहा गर्दीचे फोटोज बेळगाव live
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1048298102194449&id=375504746140458