Tuesday, December 24, 2024

/

अनेक समस्यां बाबत शेतकरी झालेत आक्रमक

 belgaum

वडगाव बाजार गल्लीतील दुकानदार,फळ विक्रेते,भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणाने शहापूर शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना तेथून बैलगाड्या घेऊन जाणे त्रासदायक ठरत आहे.अर्ध्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे बैलगाडी जाताना अनर्थ घडण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यासाठी वडगाव बाजार गल्लीतील दुकानदार व फळ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवा आणि त्यांची अन्यत्र व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यापूर्वी मनपा आयुक्तांना शेतकऱ्यांनी मनपात प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले होते.पण मनपा अधिकाऱ्यांनी निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने आता तर अर्ध्या रस्त्यावरच तेथील व्यापाऱ्यांनी धंदा थाटला आहे. शेतकऱ्यांच्या बैलगाड्या व इतर जनतेला येजा करतांना मोठी अडचण होत आहे तेंव्हा बाजारगल्लीतील अतिक्रमण ताबडतोब हटवावे अन्यथा बाजार गल्लीत शेतकरी बैलगाड्या, जनावर रस्त्यावर सोडून शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील महिलाही तिथे आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

शहापूर शेतकरी गायरान हे शेतकऱ्यांसाठी आरक्षित असतानां त्या जागेत तिथे अतिक्रमण केलेल्या संस्थानां तेथून हटवून तिथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या बैठका घेण्यास कार्यालय बांधण्यासाठी ती जागा खूली करुन द्यावी असे मा. प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांना लवकरच निवेदन देण्याचे ठरले.शिवारात भर पीकांतून शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत धनगर आपली बकरी घालून पीकांचा फडशा पाडत आहेत ते बंद होण्यासाठी संबधीत पोलिस खात्याला निवेदन देणे, अतिवृष्टिने अनेक शेतकऱ्यांची घरं पडली आहेत त्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही ती ताबडतोब द्यावी. बेळगाव जिल्हा रयत संघटना अध्यक्ष,सचिव तसेच तालूका रयत संघटना पदाधिकाऱ्यासह येथील शेतकरी संबधित खात्याला निवेदनं देऊन सुटत नसतील तर त्या त्या कार्यालयासमोर आंदोलन करुन न्याय मिळवण्यासाठी सज्ज रहायचे असे बैठकीत ठरवण्यात आले.

Farmers meeting
Farmers meeting

श्री ज्ञानेश्वर मंदीर वडगावमधे झालेल्या या बैठकीत अध्यक्षस्थानी बेळगाव शहर रयत संघटना शाखेचे अध्यक्ष हणमंत बाळेकूंद्री होते.प्रारंभी रमाकांत बाळेकूंद्री यांनी बैठकीचा उद्देश सांगून यापूढील बायपासचा लढा सक्षमपणे लढण्यासाठी तयार रहात मा.उच्च न्यायालयातील घडामोडी विषयी चर्चा झाली.त्याचबरोबर शेतकऱ्यां व्यतिरिक्त ज्या हितचिंतकांनी भक्कम आर्थिक सहकार्य केल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.राजू मरवे यांनी यापूढील रस्त्यावरील लढ्यासाठी तयार रहात मा.जिल्हाधिकारी,मा.प्रादेशिक आयुक्त,पोलिस प्रशासन,राष्ट्रीय बँक अधिकारी,कृषी अधिकारी व इतर संबधित खात्याला निवेदनं देत शहरी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन देत प्रसंगी आंदोलनासाठी तयार रहाण्याचे आवाहन केले.मा.उच्च न्यायालयात यापूढे कोणकोणते पुरावे लागतील ते वकीलांच्याकडे सूपूर्त करण्याचे ठरले.

या वेळी मोनाप्पा बाळेकूंद्री, अनिल अनगोळकर,सुभाष चौगले,भोमेश बिर्जे, गजानन देसाई सर,रघूनाथ भोसले,राजू काकतीकर सह मच्छे,अनगोळ, शहापूर,वडगाव,जूनेबेळगाव, हालगा भागातील अनेक शेतकरी मोठ्या संखेने बैठकिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.