वडगांव येथील रहिवाशी मराठा जागृती संघाचे अध्यक्ष गोपाळ बिरजे यांचे चिरंजीव जयदीप बिर्जे यांची नीती आयोगाने प्रादेशिक मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे
नीती आयोगाने देशातील विविध भागातील व्यक्तींची प्रादेशिक मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे.देशातील एकूण 37 जणांची नीती आयोगाने निवड केली असून त्यामध्ये जयदीप बिर्जे यांचा समावेश आहे.लिओ इंजिनियरिंगचे ते संचालक आहेत.
निवड झालेल्या 37 जणांना नवं नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. मागील वर्षी युक्रेन येथील एका पॉवर जनरेशन प्लांट मध्ये अनेक वर्षे बंद पडलेली १२००० किलो वॅट वीज निर्मिती करणारी स्टीम टर्बाइन मशीन दुरुस्त करण्याची जबाबदारी बेळगावच्या लिओ इंजिनिअर्स या फर्म ला मिळाली होती ती देखील त्यांनी पूर्ण केली होती.