Friday, November 22, 2024

/

८ मार्च रोजी बेळगावात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन

 belgaum

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्यावतीने रविवार ८ मार्च २०२० रोजी महिला दिनानिमित्त बेळगाव मध्ये १ले राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. शिवालय येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण हे होते.

हे संमेलन ८ मार्च २०२० रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात येणार असून सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत एकूण चार सत्रात संमेलन संपन्न होणार आहे.

पहिल्या सत्रात उदघाटन व अध्यक्षीय भाषण होणार असून दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये मान्यवर वक्त्यांच्या उपस्थितीत “मराठी भाषेसाठी माध्यमांचे योगदान ” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार असून चौथे सत्र मनोरंजनातून प्रबोधन असे असणार आहे.

यावेळी बेळगाव परिसर व तालुक्यात संपन्न होणाऱ्या विविध ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाबाबत चर्चा करण्यात येऊन बेळगाव परिसरात असे संमेलन होत नसल्यामुळे मराठी भाषिकांसाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठीस महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना आमंत्रण देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

या बैठकीला कार्याध्यक्ष महादेव चौगुले, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी. पाटील, राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव रणजीत चौगुले, सहसचिव संजय गुरव, संजय मोरे ,एम.वाय. घाडी, संजय गौंडाडकर, मोहन पाटील, मोहन अष्टेकर, एल.पी. पाटील, संदिप तरळे, गणेश दड्डीकर आधी सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.