ते दोघे एकेकाळी एकमेकांचे जिवलग होते सध्या कट्टर राजकीय विरोधक आहेत योगा योगाने दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आले दोघांनीही ना एकमेकांचे चेहरे बघितले ना बोलले तरीही त्यांच्या एकत्र व्यासपीठावर येण्याची चर्चा मात्र भरपूर झाली निमित्त होते सुळेभावी येथे जत्रा आली या कन्नड लघुपटाच्या उदघाटनाचे…
मागील काही वर्षांपासून एकत्र असणारे आणि नंतर कट्टर विरोधक म्हणून उभे असलेले राजकीय नेते एकाच व्यासपीठावर पहावयास मिळाले. या दोघांमुळे राज्याचे राजकारण बदलले अशा कट्टर नेत्यांना एकत्र पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली, ते कोण आहेत ते पाहूया या बातमीमध्ये
मंत्री रमेश जारकीहोळी आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर हे एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर दिसून आले. सुळेभावी येथील यात्रा उत्सवा निमित्त एका छोटेखानी कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आले. त्यामुळे एकच चर्चेला उधाण आला आहे. या पुढची रणनीती काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले असून या घटनेनंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून एकमेकांना पराजीत करण्यासाठी धडपडणाऱ्या या नेत्यांनी मात्र सुळेभावी येथे झालेल्या ‘यात्रा आली’ या लघु चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमात एकमेकांकडे ढुंकूनही पाहिले नाही किंवा साधा शब्दही बाहेर काढला नाही. त्यामुळे या विरोधकांची तीडा कायम असल्याचे दिसून आले.
सुळेभावी येथे महालक्ष्मी यात्रा उत्सव लवकरच होणार आहे. या यात्रेनिमित्त लघु चित्रपटाचे प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हे दोन्ही राजकीय कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आले असले तरी त्यांनी एकमेकांकडे ढुंकून पाहिले नाही किंवा एकमेकांची कर शब्दही काढला नाही. त्यामुळे राजकारणातील कलगीतुरा अजूनही असल्याचे दिसून आले. या बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.
या कार्यक्रमात माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते रमेश जारकीहोळी यांनी संजय पाटील यांच्या सोबत अधिक हितगुज करणे पसंद केले
कार्यक्रमात सुळेभावीची लक्ष्मी आणि कोल्हापूरची लक्ष्मी दोघी एकच आहेत यात्रा आली या लघु पटाने देवीची महिमा आणखी वाढेल असे रमेश जारकीहोळी म्हणाले तर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लक्ष्मी यात्रेला मूलभूत सुविधा देऊ असे म्हणाल्या.