तीन वर्षांच्या बलिकेला रॉकेल ओतून पेटवून मारल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायधीशांनी आरोपीला जन्मठेपेची सजा सुनावली आहे.27 नोव्हेंबर 2017 रोजी बलिकेला जिवंत जाळण्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील हिरेबल्लीकट्टी गावात घडली होती.
क्षुल्लक कारणावरून राजेश्वरी बारकी (3) या बालिकेला त्याच गावातील निर्मला दोडवाड या महिलेने जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर रॉकेल ओतून पेटवले होते.
या प्रकरणी दोडवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर जे सतिशसिंग यांनी आरोपी निर्मला हिला जल्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.