कोणत्याही देशासाठी शहरी ही विकासाची यंत्रे असतात. आपल्या भारताचे नेमके असेच आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के नागरिक शहरात राहतात. विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये ही लोकसंख्या 63 टक्क्यांची भर टाकत असते. वाढत्या शहरीकरणात 40 टक्के लोकांची शहरीकरणाचा भाग व्हावा यासाठी स्मार्ट सिटीची संकल्पना आखण्यात आली होती. मात्र या संकल्पनेला नेमके सुरुंग लावण्यात येत असल्याचे प्रकार बेळगाव शहर आणि परिसरात दिसून येत आहेत.
चाळीस टक्के लोकांनी शहरीकरणाचा भाग व्हावा आणि 2030 पर्यंत जीडीपी मधील त्यांचा वाटा पंच्याहत्तर टक्के असावा असे उद्दिष्ट आखण्यात आले होते. यासाठी सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक विकासाची नागरिकांना जीवनशैली दर्जात्मक व्हायला हवी असे उद्देश होते. मात्र सध्या सांस्कृतिक आणि कोणतेही जीवनशैली सोयीस्कर रित्या स्मार्ट सिटीतून नागरिकांना मिळत आहे हे मात्र चुकीचे ठरत आहे. या साऱ्यांचा विचार केल्यास स्मार्ट सिटीची संकल्पनेला सुरुंग लावण्याचा प्रकार सध्या बेळगाव शहरात दिसून येत आहे. याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा अशी मागणी होत आहे.
शहरामध्ये गुंतवणुकीस आकर्षित व्हायला हवेत विकास आणि वृद्धीचे या वाटचालीत स्मार्ट सिटीचे हे एक असेच पाऊल आहे. शहरीकरणात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ठरवलेले धोरण अशी अभियानाची व्याख्या होती. मात्र या व्याख्या लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून येत आहे. याचा विचार करून यापुढे तरी स्मार्ट सिटी ची संकल्पना सुरळीतरित्या नियोजित पणे करावी अशी मागणी होत आहे.
जेव्हा एखाद्या शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला तेव्हा नेमकं स्मार्ट सिटी म्हणजे काय? असा प्रश्न सर्वत्र ऐकावयास मिळत होता. स्मार्ट सिटीचा अर्थ विकसित आणि सुंदर असा घेतला आणि संयुक्तरीत्या मराठीमध्ये एक सुंदर विकसित शहर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र या संकल्पनेला अनेक समस्यांनी घेरले आहे. दरम्यान येथील रस्ते गटारी आणि इतर सोयी सुविधा देण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास करण्यातच धन्यता मानण्यात येत आहे. त्यामुळे या संकल्पनेला सध्या तरी सुरूंग लावण्याचे काम सुरू असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.