१९४२- स्वातंत्र्यपूर्व काळात दी रॉयल एअर फोर्स ने सांबरा येथे हवाई तळ उभारला.
१९४७- इंडियन एअरलाईन्स ने आपली कार्यवाही सुरू केली
१९८९- खासगी विमानसेवांना परवानगी मिळाली१९८९-९३- वायूदूत ही खासगी विमानसेवा कार्यरत
१९९३-९५- ईस्ट वेस्ट एअर वेज ची विमानसेवा होती कार्यरत
१९९४-९६- एन ई पी सी ने आपल्या सेवांनी केले खुश
१९९७-९८- स्पॅन एअर वेज
१९९८-९९ गुजरात एअर वेज
२००३-०९- एअर डेक्कन( किंगफिशर रेड)
रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याचे माध्यमधावपट्टी आता १४३२ मीटर वरून २३०० मीटर लांब आणि ४३ मीटर रुंद
बेळगाव सांगलीच्या पटवर्धन सरकारच्या ताब्यात असताना त्यांच्या परवानगीने १९४२ मध्ये हे विमानतळ उभारण्यात आले.
१९४७ मध्ये विमानतळ असणारे बेळगाव हे महत्वाचे शहर बनले. पुढे १९८६ मध्ये खासगीकरण करून विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकार कडे देण्यात आले. इंडियन एअर लाईन्स ची सेवा १९८० पर्यंत होती पुढे ती बंद पडल्याने १९८९ नंतर वायूदूत सारख्या खासगी संस्था बेळगाव ते मुंबई आणि बंगळूर ला सेवा देऊ लागल्या.
१९९३ ते ९५ याकाळात ईस्ट वेस्ट , १९९४ मध्ये एन ई पी सी, १९९७-९८ मध्ये स्पॅन, १९९८ मध्ये गुजरात एअर वेज सारख्या कंपनी कार्यरत होत्या.१९९९ मध्ये ही सेवा पूर्ण बंद झाली होती.१९९९ ते २००३ पर्यंत राजकारणी आणि वायुदल या विमानतळाचा वापर खासगी उड्डाणासाठी करत होते.२००३ मध्ये डेक्कन ही कमी खर्चात खासगी विमानसेवा सुरू झाली.
१९६१ मध्ये गोवा मुक्ती संग्रामावेळी एक हवाई युद्धतळ म्हणून या विमानतळाचा वापर झाला आहे