Friday, December 20, 2024

/

वडगांवात भर दिवसा खुनी हल्ला-एक गंभीर

 belgaum

बेळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून वडगाव येथे आज शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास एका तरुणाने दुसऱ्या एका व्यक्तीवर कोयत्याने खुनी हल्ला केला. भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

अभिषेक नामदेव औंधकर (वय 26, रा. मारुती गल्ली, बेनकनहळ्ळी) असे हल्लेखोर तरुणाचे नांव असून त्याने केलेल्या हल्ल्यात मूळचे अनगोळ व सध्या मन्नूर येथे राहणारे किशोर बाळकृष्ण हसबे (वय 48) हे जखमी झाले आहेत. आपल्या पत्नीसोबत हल्लेखोराचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जखमी किशोर यांना होता. याबाबत त्यांनी अभिषेकला जाब विचारून पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. याचा सूड म्हणून चिडलेल्या अभिषेकने त्यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shahapur police stationअभिषेक याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय किशोर यांना होता. याबाबत त्यांनी अनेक वेळा अभिषेकला विचारनाही केली होती. मात्र प्रत्येक वेळी अभिषेक उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर एकदा किशोर यांनी अभिषेकला तुझी पोलिस स्थानकातच तक्रार करतो असे धमकावले. तसेच धमकावल्यानुसार ते शुक्रवारी पोलीस स्थानकाकडे निघाले असता दबा धरून बसलेल्या अभिषेकने किशोरी यांना रस्त्यात अडवले आणि सोबत आणलेल्या कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी किशोरी यांच्या हातावर जबर घाव बसला असून त्यांची दोन बोटे तुटली आहेत, तसेच चेहऱ्यावरही दुखापत झाली आहे.

हल्ल्याची ही घटना घडली त्यावेळी योगायोगाने पोलीसांचे गस्ती वाहन याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी किशोर यांना अभिषेक चा तावडीतून सोडवून घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचप्रमाणे अभिषेकला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.