मागील अनेक वर्षापासून खितपत पडलेल्या एपीएमसी ते कंग्राळी रस्त्याच्या कामाचा अखेर मुहूर्त सापडला आहे. नुकतीच या कामाला चालना देण्यात आली असून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यामुळे अनेकांना त्रास सहन करण्यात आला होता. आता लवकरच हा रस्ता करावा अशी मागणी होत आहे.
एपीएमसी ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या रस्त्यासाठी आंदोलने निवेदने आणि मोर्चाही काढण्यात आला. मात्र प्रशासनाला जाग आली नव्हती. त्यामुळे रास्तारोको करून प्रशासनाला जाग आणून देण्याचे काम जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी आणि ग्रामस्थांनी केले.
रास्तारोको केल्यानंतरही केवळ आश्वासने मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, आर आर पाटील, यल्लाप्पा पाटील आधी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार होते. त्यानंतर या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू झाले. आता परत रस्त्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हा रस्ता चार पदरी होणार असून रस्त्याचे काम योग्य रीतीने व्हावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून असलेल्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे. प्रशासनाने रस्ते कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कंग्राळी परिसरातील प्रकाशातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.