मंगळवारी रात्री अनगोळ मध्ये दोन गटात झालेल्या तुफान दगडफेक प्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत.बुधवारी रात्री पर्यंत या प्रकरणी चौघांना अटक झाली आहे.अनगोळ मध्ये मंगळवारी रात्री दोन गटात हाणामारी आणि तुफान दगडफेकीचा प्रकार घडला होता पोलीस वाहनावर देखील दगडफेक झाली होती.
या प्रकरणी जखमी झालेल्या सहा जणांवर मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यात विक्रम भोसले वय 28,विशाल कंग्राळकर वय23,चेतन सायनाक वय 28,नागेश पाटील वय 24,आकाश झंगरुचे वय 23,सुरज बिरजे वय 29 अशी त्यांची नावे आहेत.
अनगोळ मध्ये झालेल्या मरगाई यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटात वादावादी होऊन त्याचे पर्यवसन हानामारी दगडफेकीत झाले होते त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत प्रकरण शांत केले होते मात्र या काळात या भागात तणाव निर्माण झाला होता.पोलीस वाहनांवर दगडेफक केलेल्या वर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जखमी पैकी सुरज बिरजे आणि आकाश झंगरुचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी नोंदवल्या गेल्या आहेत.
एकूण दगडफेकीत चौघांना अटक झाली असून त्यांची नावे समजू शकली नाहीत मात्र अटकेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.