मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीच्या कामांना चालना देण्यात आली असली तरी या स्मार्ट सिटीच्या कामामुळे आतापर्यंत तीघा जणांचे बळी गेले आहेत तर वाढते अपघात चिंताजनक बनताहेत. स्मार्ट सिटीत सुरू असलेल्या कामामुळे एका रिक्षाला अपघात झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे कामे कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वारंवार याबाबतच्या सूचना करण्यात आल्या तरी अधिकारी आणि संबंधितांनी याकडे साफ दुर्लक्ष करून नाहक त्रास देण्यात धन्यता मानली आहे. सध्या बेळगाव शहरात वाढत्या अपघातांना स्मार्ट सिटीची कामेच कारणीभूत ठरत आहेत.
नुकतीच खानापूर रोड वरील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या समोर गुरुवारी अपघात घडला होता. त्यामध्ये एकाचा बळी गेला होता. आता दुसर्या दिवशी पुन्हा रिक्षाला अपघात घडल्याने हे वाढणारे अपघात कधी थांबणार आणि स्मार्ट सिटीची कामे कधी एकदा पूर्ण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र ही कामे करण्यासाठी अधिकारी धडपडत नसल्याचे दिसून येत आहे.शुक्रवारी सकाळी कॉलेज रोडवर ऑटो अपघातात महिला जखमी झाली आहे
विकसित आणि सुंदर शहर अशी स्मार्ट सिटीची व्याख्या असली तरी ही व्याख्या सध्या बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढते अपघातांनी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे तिघा जणांचा बळी गेला आहे. याचा विचार आता गांभीर्याने होणे गरजेचे आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करून अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराने कामे लवकर आटोपती घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम अनेकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.