Saturday, January 4, 2025

/

क्षुल्लक कारणावरून जुने बेळगाव येथे क्लीन्नरचा निघृण खून

 belgaum

क्षुल्लक कारणावरून बाटलीने घाव घालून आणि दगडाने ठेचून तिघा जणांनी आपल्या मित्राचा निघृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी जुने बेळगाव येथील शेतवाडीत उघडकीस आली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून दोघ जण फरारी आहे.

खून झालेल्या इसमाचे नाव मोहम्मद समिउल्ला मोहम्मद शफीउल्ला (वय 41 वर्षे, रा. मारम्मा देवस्थान, चित्रदुर्ग) असे आहे. मोहम्मद हा ट्रकवर क्लिनरचे काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद समिउल्ला मोहम्मद शफीउल्ला हा आपल्या तीन मित्रांसमवेत मंगळवारी रात्री जुन्या पी. बी. रोडवरील एका दारूच्या बार मध्ये दारू पिण्यासाठी गेला. त्याठिकाणी बारमध्ये माचीसच्या काडीवरून मोहम्मद आणि त्याच्या मित्रांचे बार मालकाशी भांडण झाले. त्यामुळे हे चौघेही जण दारूच्या बाटल्या घेऊन जुने बेळगाव येथील जुन्या पी. बी. रोडशेजारील शेत वाडीमध्ये पार्टी करण्यास गेले.

रात्री उशिरा चौघांनी आणलेल्या दारूच्या बाटल्या रिकाम्या झाल्या. त्यानंतर संपलेल्या दारूच्या बाटल्यांवरून चौघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्याचे पर्यवसान संतापलेल्या एका मित्राने रिकाम्या बाटलीने मोहम्मदच्या डोक्यात घाव घालण्यामध्ये झाले. वर्मी घाव बसल्याने मोहम्मद शेतातील चिखलात कोसळला. त्यानंतरही ही तिघा मित्रांनी त्याला बाटली नाही घालण्याबरोबरच दगडाने ठेचले. परिणामी मोहम्मद समिउल्ला मोहम्मद शफीउल्ला हा जागीच गतप्राण झाला.

आपल्या हातून आपल्या मित्राचा खून झाला हे लक्षात येताच मोहम्मदच्या तिघाही मित्रांचे धाबे दणाणले. त्यानंतर त्यांच्यापैकी एकजण मोहम्मदच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ बसून राहिला तर उर्वरित दोघांनी शहापूर पोलीस स्टेशन गाठले. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला झाला आहे. यासंदर्भात दोघा जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरारी झाला आहे. शहापूर पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार फरारी आरोपीचा शोध घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.