बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावचा सुपुत्राची दिल्ली येथील आगामी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड झाली आहे.नामदेव रामचंद्र देसाई असे त्याचे नाव असून तो इंडियन आर्मी मध्ये जवान म्हणून कार्यरत आहे.
बुधवारी दिल्लीत थल सेना दिना निमित्ताने झालेल्या पथ संचालनात सहभागी झाला होता आगामी 26 जानेवारी रोजी लाल किल्यावर होणाऱ्या पथ संचलनात सहभागी होणार आहे.
नामदेव हा वयाच्या 21 व्या वर्षी 2016 मध्ये सिग्नलस मध्ये भर्ती झाला होता.येळ्ळूर मधल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नामदेवची पथ संचलनात निवड झाली आहे.येळ्ळूरवाडी शाळेत प्राथमिक तर माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय येळ्ळूर मध्ये झाले आहे त्याने बी के कॉलेज मधून बी एस सी पूर्ण केलं आहे.
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर या गावात सर्वाधिक जवान लष्करी सेवेत अनेक सैन्य दलात अधिकारी देखील आहेत नामदेव याने थल सेना दिवस परेड मध्ये सहभागी होऊन येळ्ळूर गावची शान वाढवली आहे.