दुचाकी अपघातात एक युवक ठार तर एक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी यमकनमर्डी जवळ घडली आहे.सकाळी सातच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.
किरण यशवंत बजंत्री वय 20 रा.कडोली असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे तर बंबरगा येथील युवक अक्षय मॅगेरी वय 19 हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किरण हा हत्तरगी टोल नाक्यावर कामाला आहे नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी तो कामावर जात होता उसाच्या ट्रकला जोराची धडक दिली त्यानंतर जखमी अवस्थेत दोघांना इस्पितळात दाखल करण्यात आले त्यावेळी एक ठार तर एक जखमी झाला आहे.यमकनमर्डी।पोलीस अधिक तपास करत आहेत.