विहिरी शेजारील खड्ड्यात पडून बारा वर्षीय बलिकेचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील चिरमुरी येथे घडली आहे. मेघा मल्लाप्पा चौगुले वय 12 वर्षे रा.मन्नुर असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.
मेघा आपल्या मामाच्या घरी रहायला गेली होती सोमवारी मामाच्या शेतात बटाटा लागवड केली जात होती ती मामाच्या कुटुंबा सोबत शेताला गेली होती.
शेतात सगळेजण काम करत असतेवेळी सायंकाळी पाच च्या दरम्यान विहिरीवरील विद्युत मोटार बंद करायला गेली असता पाय घसरून विहिरी शेजारी असलेल्या दहा फूट खोल खड्ड्यात पडली याची कल्पना कुणाला नव्हती या खड्ड्यात चिखल पाणी होते सुरुवातीला याकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते साडे पाच वाजता मेघा कुठं आहे शोधले असता ती मृत अवस्थेत विहिरीत आढळली.
चिरमुरी गावातील शेतवाडीत ही घटना घडली आहे पाय घसरून चिखल असलेल्या खड्ड्यात पडल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.या घटने नंतर पश्चिम भागात हळहळ व्यक्त होत आहे.बेळगाव ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.