गेल्या पावसात झालेल्या अतिवृष्टीने शहापूर,येळ्ळूर भागात ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्यांना फूटलेले बांध व मोठमोठे खड्डे पडल्याने ते भरण्यासाठी हजारो रुपये खर्च येणार आहे.सरकारने शेतकऱ्यांना ते भरण्यासाठी म्हणून दहा हजार रुपये मंजूर केले आहेत या निधीचा केवळ ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी त लाभ घेतला पण शहरी भागातील शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागले आहे.
शेतातील बांध,खड्डे पडलेले भरण्यासाठी म्हणून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कोणी संबधित तलाठी,ग्रामसेवक,किंवा कृषी अधिकाऱ्यांनी तसदिच घेतली नाही. एकीकडे शेतफाळा पावती त्यांच्या माणसाकरवी घरोघरी पाठवून वसूल करतात.पण सरकारी योजनांची माहिती मात्र देत नाहीत.आता शेतकरी विचारायला गेल्यास ती योजनां संपली म्हणून सांगतात. अशाने शहरी शेतकऱ्यांना आपले फूटलेले बांध व पडलेले खड्डे भरण्यासाठी भूर्दंड सोसावा लागणार आहे.
भातपीकं तर गेली वर हा खर्च यामूळे शेतकरी चिंतेत पडला आहे.वरिष्ठ कृषी अधिकारी वृत्तपत्रातून सांगतात दहा हजार रुपये अनुदान मिळते म्हणून पण प्रत्यक्ष शेतकरी विचारायला गेल्यास योजनां संपल्याची उत्तरे देतात.तेंव्हा वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी शहरी भागातील शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष बांध व पडलेले खड्डे पाहूनच अनुदान मंजूर करावे.अन्यथा धन्यास कण्या चोरास मलिदा दिल्यासारखे होईल. अशी भावना व्यक्त केली जात आहे.