क्विक् सर्व्ह रेस्टॉरंट (क्यूएसआर) अर्थात तत्पर सेवा उपहारगृह हा आजच्या आधुनिक युगातील हॉटेलिंग व्यवसायाचा मूलमंत्र आहे. हा मूलमंत्र अंगीकारणाऱ्या फ्रॅंचाईजी फुड औटलेट्सचे पेव सध्या देशभरातील सर्व शहरांमध्ये झपाट्याने पसरत आहे. लवकरच स्मार्ट होऊ घातलेले बेळगाव शहर देखील त्याला अपवाद नाही.
पूर्वीच्या आल्हाददायक टुमदार बेळगाव शहराचे लवकरच स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होणार म्हंटल्यावर विविध चमचमीत चवदार पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी कांही स्मार्ट फुड औटलेट्स सध्या शहरात आळंबी यासारखी पसरली आहेत.

यापैकी बहुतांश औटलेट्स अर्थात उपहारगृह अत्यंत अरुंद जागेत अगदी शेहे- सव्वाशेहे चौरस फुटाच्या जागेत असली तरी आकर्षक अंतर्गत सजावट आणि चविष्ट पदार्थांमुळे लोकप्रिय बनली आहेत. तसेच यापैकी बरीच औटलेट्स सेल्फ सर्व्हिस पद्धतीची आहेत.
गेल्या काही महिन्यात नेहरूनगर भागात अशी 4 नवीन औटलेट्स अर्थात उपहारगृह सुरू झाली असून ती त्यांच्या त्यांच्या- त्यांच्या ‘यूएसपी’मुळे दिवसेंदिवस लोकप्रिय बनताहेत. या ठिकाणची अंतर्गत सजावट तर लक्षवेधी आहेच, शिवाय अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ याठिकाणी आणि ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.