बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचे पहिले पुष्प गुंफताना सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी बेळगाव प्रश्नावर मार्मिक भाष्य केले. याविषयी पुढे बोलताना, कर्नाटकातील नेत्यांनी व कर्नाटकी जनतेने सुद्धा बेळगाव येथील मराठी जनतेला कशी वागणूक द्यावी यावर विचार करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
कर्नाटक, महाराष्ट्र, बेळगावचा सीमाप्रश्न हा कौरव-पांडवांचे युद्ध नसून दोन्ही बाजूनी पांडवा- पांडवांमध्ये चाललेला संस्कृती टिकवण्याचा लढा आहे, असे त्यांनी बेळगाव प्रश्नाविषयी भाष्य केले.
महाराष्ट्रातील जनतेपेक्षा सीमावर्ती भागातील जनतेने संस्कृती व भाषा टिकवण्याचे मोठे काम केले आहे. महाराष्ट्रात एकीकडे व्याख्यानमाला बंद पडत असताना, बेळगावात मात्र अजूनही व्याख्यानमालेची परंपरा अखंडित आहे., त्याचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेने घेण्याची गरज आहे.
जगातील कोणतीही भाषा वाईट नाही, प्रत्येकाचे आपल्या मातृभाषेवर प्रेम असते. मलाही कन्नड भाषेविषयी आदर आहे. कन्नड भाषेतील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन अस्खलित मराठीत साहित्यिक भाषणे केली आहेत.
त्यांनी वि स खांडेकर यांना पुरस्कार देताना माजी उपराष्ट्रपती बि. डी. जत्ती यांनी केलेल्या भाषणाचा आवर्जून उल्लेख केला. मल्लिकार्जुन खरगे हे गुलबर्गाचे आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आहेत महा विकास आघाडीचे सरकार बनवताना त्यांच्याशी आम्ही संवाद मराठीतच करत होतो ते देखील आमच्याशी संवाद मराठीतच करत होते मराठी विरुद्ध कानडी अशी दरी कमी करायला हवी असं देखील सांगायला ते विसरले नाहीत
भारतातील सर्व संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. असे काम महाराष्ट्र करत आहे. कन्नड भाषिक शाळा आणि कन्नड भाषिक महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कन्नड भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते.
अनुदान पुरवते.
त्याचप्रमाणे सीमावर्ती भागातील मराठीसाठी बीएस येडुरप्पा आणि कर्नाटक शासनाने प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणालेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सूचित केल्याप्रमाणे सीमावर्ती भागातील लढा देणाऱ्या लोकांनी एकजुटीने सांस्कृतिक संवर्धनासाठी आणि भाषेच्या लढ्यासाठी झगडले पाहिजे असे संजय राऊत यांनी सांगितले. सीमाप्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्याचा लवकरच निकाल येईल, पण साहित्य संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून भाषेचे संवर्धन केले पाहिजे.आणि विखुरलेल्या लोकांच्या कडून यश मिळणे अशक्य आहे एकत्र याल तर विजयी व्हाल असेही ते म्हणाले!