त्वरित करा शहापूर मुक्तिधाम येथ शहापूर स्मशानभूमी अर्थात शहापूर मुक्तिधाम बागबगीचा करून अल्हाददायक करण्यात आले असले तरी या ठिकाणच्या अंत्यविधीसाठी वापरण्यात येणाऱ्या शेडची पार दुरावस्था झाली असून त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
शहापूर मुक्तिधाम येथील अंत्यविधीसाठी असणाऱ्या शेडचे पत्रे उडून त्याची दुर्दशा झाली आहे. कारण सध्या याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाची झळ सोसावी लागू नये म्हणून सध्या शहापूर मुक्तिधामातील शेडमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. तथापि या शेडच्या पत्र्यांची वाताहात झाली असल्याने आपण उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहोत कि शेडमध्ये? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. कारण तुटलेल्या आणि उडून गेलेल्या शेडच्या छतामधून नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
शहापूर मुक्तिधाम येथील अंत्यविधीसाठी असणाऱ्या शेडचे पत्रे उडून त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या अतिवृष्टीच्या काळात शहापूर मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची काय अवस्था होत असेल हे सध्या या ठिकाणच्या अंत्यसंस्कारासाठीच्या शेडची अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येते. सदर शेडच्या दुरावस्थेस शहापूर मुक्तीधाम व्यवस्थापन की बेळगाव महानगरपालिका जबाबदार आहे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शहापूर मुक्तिधामाचे स्थानिक व्यवस्थापन आपल्यापरीने व्यवस्थित काळजी घेत आहे.
त्यामुळेच महापालिकेचे या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन शहापूर मुक्तिधामातील बंदिस्त अंत्यसंस्कार विधी ठिकाणच्या शेडचे मोडकळीस आलेले पत्रे महापालिकेने पूर्ववत व्यवस्थित बसवावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे.