Sunday, November 17, 2024

/

बेळगाव रेशन दुकान मालकांची निदर्शन

 belgaum

बेळगाव शहर परिसरात असलेल्या रेशन दुकान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली.

गेल्या एक जानेवारी पासून सर्व्हर डाऊन समस्येने रेशन दुकान दारांना ग्रासले आहे त्यामळे सकाळ पासून सायंकाळी पर्यन्त रेशन दुकाना समोर गर्दी वाढत आहे परिणामी जनतेचा रोष रेशन दुकान दारावर येत आहे यासाठी रेशन दुकानात सर्व्हर डाऊनची समस्या दूर करा अशी मागणी रेशन दुकान संघटनेने केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी याना निवेदन देत त्यांनी ही मागणी केली आहे.रेशन दुकानदारांना तांत्रिक माहिती पूरवा सर्वर डाऊन ची समस्या निकालात काढा, रेशन दुकानदारांचे गेल्या तीन महिन्याचे कमिशन बँक खात्यात जमा करा अश्या मागण्यासाठी बेळगावातील रेशन दुकान संघाच्या मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.