सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत हे बेळगावला सार्वजनिक वाचनालयाच्या बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उदघाटनाला उपस्थित राहण्यासाठीं शनिवारी बेळगावला येत आहेत.
स्कुल ऑफ कल्चर येथे नाथ पै व्याख्यानमालेला सायंकाळी साडे पाच वाजता प्रारंभ होणार आहे.यावेळी संजय राऊत यांची प्रकट मुलाखत प्रा आनंद मेणसे आणि नरेंद्र कोठेकर घेणारं आहेत.
यावेळी कन्नड आणि मराठी पत्रकारांना पुरस्काराचे वितरण संजय राऊत यांच्या हस्ते केले जाणार आहे.पोलिसांनी आयोजकांना काही अटीवर कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली आहे.