काँग्रेसमधे दोन नाही तीन नाही तर चार गट आहेत.प्रत्येक गटाला आपलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्हावे असे वाटते.अध्यक्ष कोणीही झाले तरी सगळ्यांनी मिळून कार्य करायला पाहिजे असे मत आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हाय कमांडने दिल्लीला बोलवले असून ते दिल्लीहून आल्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होईल.
चिक्कबल्लापूर येथील वाल्मिकी समाजाच्या स्वामीजींनी राहुल गांधींना पत्र लिहून तुम्हाला अध्यक्ष करा अशी मागणी केली आहे असे पत्रकारांनी विचारले असता जारकीहोळी म्हणाले ही गोष्ट खरी आहे.
अनेकांनी तशी पत्रे ,निवेदने पाठवली आहेत.पण पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ते बघायचे.अध्यक्ष कोणीही झाले तरी आम्ही सगळे मिळून काम करू असे जारकीहोळी म्हणाले.