बेळगावमध्येच मिळणाऱ्या हिरव्या वाटाण्यांसह , मटार ,वांगी ,सोले , गाजर यासह नानाविध भाज्यांनी बेळगावची बाजारपेठ सजली आहे. तर इंग्रजी नववर्षातील पहिलाच सण असलेल्या संक्रांतीसाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे.
काही अंशी गतवर्षीच्या तुलनेत दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामागे तीळ , तुप या महत्वाच्या पदार्थाचे वाढलेले दर हे कारण आहे. मात्र एकदा बाजारपेठेत फेरफटका मारला की संक्रांतीच्या अनुषंगानेच खरेदी सुरु झाली आहे, हे जाणवते. संक्रांत म्हणजे नानाविध भाज्यांसाठीचे संमेलनच जणू , सध्या शहरासह उपनगरांमध्येसुध्दा भाजी मंडईला बहार आला आहे.
हिरवे वाटाणे आणि मटार , हिरवी आणि काळपट वांगी , हिरवीगार मेथी आणि कांदापात , लाल माठ , गुलाबी गाजर , पांढरे सोले व मुळे , तसेच फ्लॉवर याबरोबरच भेंडी , बिनीस आणि विविध प – कारच्या सोलायच्या शेंगा यामुळे बाजारपेठेला रंगबेरंगी स्वरुप प्राप्त झाले आहे . सध्या वाटाण्याच्या शेंगांचा दर ८० रुपये आहे. अर्थात याची सर्वाधिक आवक शहापूर बाजारपेठेतच दिसते.
साधारण बँक ऑफ इंडियाच्या कोपऱ्यापासून शहापूर, खडेबाजारपर्यंत सर्वत्र या शेंगा विक्रीस घेऊन बसलेले विक्रेते दिसतात. मध्यवर्ती बाजारपेठेतही या शेंगा उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे प्रमाण कमी आहे. त्याबरोबरच मटार ६० रुपये किलो , गाजरे ३० रुपये अर्धा किलो , वांगी २० रुपये पावकिलो , मेथी , पालक , शेपू दहा रुपयाला दोन जोड्या असे दर आहेत . सोले मात्र १०० रुपये किलो माप या दराने उपलब्ध आहेत . त्या बरोबरच कांदापात , बिट , दुधी यांचीही आवक वाढली आहे . संक्रांतीसाठीच्या खास बाजारपेठेमध्ये सणासाठी आवश्यक सर्व पदार्थ उपलब्ध आहेत.
या तयार पदार्थानी नोकरदार महिलांची मोठी सोय केली आहे . तीळ पापडी , पाच प्रकारचे गजक , सोहन हलवा , रेवडी , शेंगापोळी , पुरणपोळी यांचे स्टॉल सर्वत्र दिसत आहेत . तीळपापडीचे दर १५० रुपये आहे . तर शेंगा पोळी ५० रुपयांना एक पाकिट , पुरणपोळी ४० रुपयांना ४ या दराने मिळत आहेत . रेवडी १०० रुपये किलो असून तिळगुळ ६० रुपयेकिलो आहेत . यंदा तीळ आणि तुपाचा दर वाढल्याने या पदार्थामागे १० टक्क्याने वाढ झाली आहे . तीळ २२० रुपये तर तुप ४८० रुपये किलो असा दर आहे . संक्रांतीला मलिदा हा पदार्थ आवर्जुन केला जातो . आजही बहुसंख्य घरांमध्ये तो घरी केला जात असला तरी दुकानामदये २४० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे . याचबरोबर सोहन हलवा आणि असंख्य गोड पदार्थ ग्राहकांची प्रतिक्षा करत आहे . संक्रांतीच्या आदले दिवशी होणाऱ्या भोगी निमित्त बाजारपेठेत भाकयाही उपलब्ध आहेत . विशेष म्हणजे बाजरीच्या व जोंधळ्याच्या कडक भाकऱ्यांची चळत रस्तोरस्ती दिसते आहे . भाकऱ्यांचे पाकिट ५० रुपयांना उपलब्ध आहे . त्याचबरोबर विविध प्रकारच्या म्हणजेच तीळ , शेंगदाणे , खोबरे , कारळ म्हणजेच कोरटे , जवस यांच्या चटण्यासुध्दा उपलब्ध आहेत . ३० रुपयांना एक पाकिट असा त्यांचा दर आहे . सणाच्या निमित्ताने संक्रांती रथसप्तमीपर्यंत हळदी – कुंकूब नववधूची पहिली संव मांत साजरी होणार आहे . यासाठी विविध प्रकारचे आकर्षक स्वरुपातील हलव्याचे दागिने विक्रीसाठी सज्ज आहेत . तर वाण देण्यासाठी विविध प्रकारचे डबे बेगवेगळ्या वस्तु आहेतच . परंतु यंदा व्हाईट मेटलच्या वस्तु हे आकर्षण आहे . यामध्ये कमळ , थाळी , तबक , प्लेट , डबे असे विविध नमुने उपलब्ध आहेत .