कर्नाटकाचे पहिले मुख्यमंत्री एस निजलिंगअप्पा यानी “१९५६ मध्ये म्हैसूर राज्याच्या म्हणजेच आजच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व विधानसभेच्या पहिल्याच दिवशी त्यानी स्पष्ट केल की महाराष्ट्र राज्याचा एक मोठा भाग चूकीच्या पद्धतीने आमच्या म्हैसूर राज्यात आला आहे. तेथील मराठी माणसावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. तो सर्व मराठीभाग महाराष्ट्राचा आहे. आणि आम्ही तो भाग लवकरच महाराष्ट्राला देऊ करणार आहोत. हे त्यांचे आधिकृत वक्तव्य आजही कर्नाटकाच्या विधानसभेतील प्रोसिडिंग मध्ये उपलब्ध आहे .
सध्या बेळगाव सीमा प्रश्नी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी दोन्ही कडून वक्तव्ये सुरू आहेत त्यामुळे 1956 साली एस निजलिंगप्पा काय म्हणाले होते याची माहितीची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.
कर्नाटकचे परिवाहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सीमा प्रश्नाचा दावा खोडून टाकू अशी दारपोक्ती करत महाराष्ट्रातील नेत्यां बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यावर समितीच्या युवकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यामुळे आम्हाला राज ठाकरे यांच्या चुकीच्या वक्तव्याची आठवण करून देण्यापेक्षा स्वता सवदी यानी स्वताच्या राज्यातील पहिल्या मुख्यमंत्र्याचा अभ्यास करायला हवा असा टोला लगावला आहे.
सवदीचे यांचे हे वक्तव्य म्हणजे अपूर्ण अभ्यासाचा कळस. मा. चंदगडचे आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांच्यावर जी खालच्या पातळीची टिका त्यांनी केली. ते कर्नाकाच्या संस्कृतीला शोभते का ? आणि त्यामुळे त्यानी केलेल्या वक्तव्याचा आम्ही मराठी युवा मंचच्या वतीने जाहीर निषेध करतो असे सूरज कणबरकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
प्रशासनाचे अजब वाटते लोकशाहीरीत्या बेळगावात येऊन शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रातील आमचे लोकप्रतिनिधी बेळगावात आमच्या बरोबर आंदोलनात सहभागी होतात. त्यांच्यावर नको ते खटले दाखल करतात आणि हे कर्नाटकातील नेते वाट्टेल ते बोलतात बेळगावात भाषिक तेढ निर्माण करतात, बेळगावची शांतता भंग करतात मात्र प्रशासन हाताचीघडी तोंडावर बोट याला काय म्हणावे असेही सूरज कणबरकर यांनी म्हटले आहे.
Good news