बेळगाव शहरातील जेएनएमसी कॉलेज कॅम्पस मध्ये लावलेल्या कार मध्ये दुर्मिळ साप आढळला त्या सापाला सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी शिताफीने पकडून जीवनदान दिले.
जे एन एम सीत शिक्षण घेत असलेली हरियाणाची विद्यार्थीनी इंदू यादव हिने आपल्या कारचा दरवाजा उघडताच,मॅट खालूनडोकावत असलेला सर्प दिसला भीतीने बोबडी वळलेल्या इंदूने मित्रांना बोलावले. व्यवस्थापकांनी लगेच सर्पमित्र आनंद चिट्टीना पाचारण केले.
चिट्टी यांनी कार मधील सर्प मोठ्या शिताफीने पकडला यावेळी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
कार मध्ये आढळलेला सर्प रुका प्रजातीतील दुर्मीळ *रंगीत रुका वृक्षेय* (painted bronze back tree snake )सर्प आहे.
सडपातळ व बिनविषारी असणारा हा सर्प झाडावर वास्तव्य करतो. बेडूक, सरडे, पक्षी याचे मुख्य भक्ष आहे. हा साधारण चार फूट वाढतो 2 ते 8 अंडी घालतो अशी माहिती आनंद चिट्टी यांनी दिली.
झाडावर कमालीचा चपळ असणारा हा सर्प एक फांदी वरून दुसऱ्या फांदीवर उडी मारू शकतो. कर्नाटक,केरळच्या किनारपट्टीसह पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, ओरिसा इथं हा सर्प राहतो.*बेळगाव मध्ये हा सर्प* पहिल्याच वेळी सापडला आहे. वृक्ष तोडीमुळे याचे अस्तित्व धोक्यात आलेआहे असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगीतले .