आपण कन्नड विरोधी नाही आणि कन्नड विरोधी विधाने केलेली नाहीत त्यामुळे ज्यांनी कुणी माझ्या विधानांचा गैर उपयोग केला त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती गोकाक चे आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे .
भाजपमधील मराठी भाषिक नेत्यांनी एकत्र यावे आणि आपला बेळगाव ग्रामीण साठीचा उमेदवार मराठी असेल यासाठी प्रयत्न करावेत, असे मी बोलत होतो मात्र त्याचा विपर्यास लावून कन्नड विरोधी बोलत असल्याचे समज पसरविण्यात येत आहेत. आपण कधीही कन्नड विरोधी नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे .
बेळगाव ग्रामीण मध्ये नावगे या गावी भाजप कार्यकर्त्यांनी एक मेळावा आयोजित केला होता. यावेळी मराठी नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाकडून मराठी उमेदवार मिळवून घ्यावा. असे आवाहन आपण केले होते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.