हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारे मराठी कॉलनीतील रहिवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकतेच तालुका पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सोडवा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. यावेळी कलादगी यांनी लवकरच भेट देऊन संबंधित ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी रहिवाशांनी हिंडलगा मंडळ पंचायत अस्तित्वात असताना सर्वे क्रमांक 213 व एक आणि दोन मधील जागेत प्लॉट पाडून त्यांची विक्री रीतसर करण्यात आली होती. त्यानुसार लेआउट मध्ये एक एकर 18 गुंठे खुली जागा म्हणून सोडण्यात आली होती. पण या जागेत काही भूमाफियांनी मूळ मालकांना हाताशी धरून 2014 साली पुन्हा नवीन तयार करून प्लॉट पाडले आहेत. याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवून न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे सदर जागा न्याय प्रविष्ट असून न्यायालयानेही याबाबत खुल्या जागेचा निकाल दिला आहे.
मात्र सध्या येथे कोणतेही काम करण्यात ग्रामपंचायत सहकार्य करत नाही. याचबरोबर सोयी सुविधा देण्याकडे ही दुर्लक्ष केले आहे. 2017 पर्यंत कर भरून घेतला होता त्यानंतर ते भरून घेण्यात आला. मात्र त्यानंतर याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. आमची सर्व कागदपत्र योग्य असून आम्हाला सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी कलादगी यांच्याकडे करण्यात आली आहे.
न्यायालयाने या जागेचा निकाल दिला आहे. त्या जागेत सध्या काम सुरू करण्यात आले आहे. आणि जी कागदपत्रे सुरळीत आहेत त्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. त्यामुळे यापुढे या नागरिकांचे कसे होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी मराठी कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते