श्रीक्षेत्र दक्षिण काशी श्री कपलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळातर्फे बेळगांवमध्ये प्रथमच सर्वसामान्य लोकांसाठी येत्या शनिवार दि. 18 आणि रविवार दि. 19 जानेवारी 2020 रोजी ‘कालसर्प दोष शांती’ या धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात अष्टकूल श्री नागदेवतेची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली आहे. तेंव्हा या नागदेवतेच्या सानिध्यात ‘कालसर्प दोष शांती’चे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 18 आणि 19 जानेवारी 2020 रोजी विधीवत हा धार्मिक विधी होणार आहे. तरी ज्यांना हा विधी करावयास सांगण्यात आले आहे अशा भक्तांनी मंदिराशी 0831-2487711 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपलेश्वर मंदिर बेळगांवचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.