गेला आठवडा भर चर्चेत असलेली बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील नामांकित अश्या पायोनिअर बँकेत नवीन संचालक मंडळ बसले असून सर्व सदस्यांची बिन विरोध निवड झाली आहे. संचालक मंडळासाठी 21 जणांनी अर्ज केले होते शनिवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने ही बिन विरोध निवड झाली आहे.सकाळी तुकाराम बँकेचे संचालक बिन विरोध झाले होते सायंकाळ होता होता पायोनिअर बँक देखील अ विरोध झाली आहे.
या संचालकांच्या बिन विरोध निवडीमुळे माजी अध्यक्ष प्रदीप अष्टेकर यांच्याकडे पायोनिअर अर्बन बँकेची सूत्रे गेली आहेत त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बिन विरोध निवड झाली आहे.
सामान्य गटातून रमेश शिंदे, गजानन पाटील(गमपा),शिवराज पाटील,रणजीत चव्हाण पाटील,प्रदीप अष्टेकर,रवी दोड्डनावर, अनंत लाड यांची तर सुवर्णा शहापुरकर व लक्ष्मी कानूरकर यांची महिला गटातून, सुहास तरळ ,गजानन ठोकणेकर यांची मागास अ गटातून, विद्याधर कुरणे व मारूती शिगेहळळी यांची अनुसूचित जाती जमाती गटातून बिन विरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून उदय पाटील यांनी काम पाहिले.निवडणूकीत होणारा बँकेचा खर्च टाळण्यासाठी बिन विरोध करण्यासाठी प्रयत्न केले त्याला यश मिळाले असे नव नियुक्त संचालकांनी सांगितले.