पायोनियर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी संचालक पदाच्या 13 जागांसाठी एकूण 21 अर्ज दाखल करण्यात आले.
बेळगाव पायनर अर्बन को ऑपरेटिव बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 31 जानेवारी रोजी होणार असून आज गुरुवार 23 जानेवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज दिवस अखेर एकूण 21 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी 14 अर्ज सर्वसामान्य जागेसाठी, 3 अर्ज महिला राखीव जागेसाठी 2 अर्ज अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला गेला. काल बुधवारी दिवसाखेर एकूण 10 अर्ज दाखल झाले होते.
दरम्यान प्रभारी अध्यक्षांसह पाच संचालक आणि बहुसंख्य सभासदांना सदर निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. हा प्रकार सध्या सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला असून अपात्र ठरलेल्यांनी जिल्हा सहकार निबंधकांकडे (डीआर) तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या भवितव्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा होत आहे.