सहकारी बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर प्रत्येक बँकेत सत्ताधारी पॅनल आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. मराठा बँकेत ही असेच वातावरण आहे. सत्ताधारी पॅनेलने काही नवीन लोकांना संधी देताना काहीना डावलल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळेच डावलले गेलेल्यांपैकी प्रबळ उमेदवार सत्ताधारीना आव्हान ठरत असल्याचे चित्र आहे.
मराठा बँकेत सध्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेल्या परिस्थितीत माजी नगरसेवक प्रसिद्ध अडत व्यापारी मोहन बेळगुंदकर यांचे आव्हान उभे राहिलेले आहे.
मराठा बँकेत सध्या सत्ता उपभोगणाऱ्या पॅनेलवर आपली निवड केली जाईल अशी आशा मोहन बेळगुंदकर यांना होती. सत्ताधारी पॅनल ला निवडून देण्यात त्यांनी अनेकवेळा आपली शक्ती लावली होती. यामुळे यावेळी संधी देऊ अशा प्रकारचे आश्वासन सत्ताधारी पॅनलमधील काही सदस्यांनी त्यांना दिले होते. मात्र ऐनवेळी बिनविरोध निवड जाहीर करताना वेगळ्या उमेदवारांना संधी देण्यात आली.
या प्रकारची संधी आपल्याला मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र तशी संधी न मिळाल्यामुळे निवडणूक लढवण्याचा विचार त्यांनी केला असून आपल्या प्रचाराच्या धडाक्याची सुरुवात केली आहे.
मोहन बेळगुंदकर राजकीय क्षेत्रातील एक नाव आहेच त्याचबरोबरीने सामाजिक क्षेत्रातील त्यांनी अनेक उपक्रमात आणि विविध संस्थांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली . त्यांच्या पत्नी वंदना बेळगुंदकर यांनी बेळगाव शहराचे दोन वेळा महापौर पद भूषवले आहे.त्यामुळे संपूर्ण बेळगाव शहरात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. मराठा बँकेच्या सभासद वर्गातून त्यांचे वेगळे स्थान आहे.शेतकरी कष्टकरी कामगार नोकरदार या वर्गांमध्ये त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवलेले असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. मराठा बँकेच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवणारे सर्व सभासद मदत करतील मतदान करतील अशी आशा आहे. तसा पाठिंबा आपल्याला मिळत आहे अशी माहिती त्यांनी बेळगाव live ला याविषयी बोलताना दिली. सत्ताधारी पॅनल ने का डावलले? असा प्रश्न विचारला असता तो त्या पॅनलचा निर्णय आहे. मात्र आपण निवडून येणार आणि मराठा बँकेच्या राजकारणात एक संचालक म्हणून प्रवेश करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.