माजी जवान आणि प्रादेशिक सेनेतील व्यक्तींसाठी संरक्षण दलातील ‘सोल्जर जनरल ड्युटी आणि क्लार्क’ या पदांसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या 20 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सेनादलातील आपल्या सेवानिवृत्ती कालावधीच्या दोन वर्षे आधी ज्यांनी किमान पाच वर्ष तिरंग्याची सेवा केली आहे. त्याचप्रमाणे ज्यांना मेडिकल कॅटेगिरी मध्ये ‘shape-1’ मिळाला आहे असे माजी जवान या भरती प्रक्रियेस पात्र आहेत. पात्र उमेदवारानी येत्या 20 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर ( एमएलआयआरसी) येथे भरती मेळाव्यास हजर रहावयाचे आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार किमान मॅट्रिक किंवा त्यावरील शिक्षण घेतलेले असावेत अथवा एससीई- lll साठी नॉन मॅट्रिक अशी शैक्षणिक पात्रता असेल. सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराचे वय 46 वर्षाखालील असावे, तसेच क्लार्क पदासाठी 48 वर्षाखालील असावे.
उपरोक्त पात्रता पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्याला येताना डिस्चार्ज बुक, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग / ट्रान्सफर सर्टिफिकेट बोनाफाईड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसीईल सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी असलेले व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट यांची मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, असे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे कळविण्यात आले आहे.