मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील एक जवान बेपत्ता झालेला तो जवान सुखरूप परतला आहे जवान बेपत्ता झाल्याची तक्रार कॅम्प पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली होती.
संदीप आणि त्यांची पत्नी दीपिका यांच्यात मंगळवारी 31 डिसेंबर रोजी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते त्यामुळं चिडून तो घरा बाहेर मित्राकडे गेला होता अशी माहिती त्या जवानाने पोलीस तपासात दिली आहे.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे नाईक पदावर सेवा बजावणारा संदीप सुपाड पाटील (वय 32, मुळ रा. घर नं. 72, पोस्ट ऑफिसनजीक कर्देकुर्दे ता. नंदुरबार, महाराष्ट्र) हा जवान बेपत्ता झाला होता.