अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास काकती पोलिसांनी अटक करून त्याच्यावर पोकसो कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे.
वासीम अल्लाबक्ष बागी वय 22 रा.आंबेडकर गल्ली काकती असे त्या नराधामाचे नाव आहे.काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल फडगल यांनी ही कारवाई केली आहे.
सदर आरोपी गेल्या आठवडा भरा पासून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्त्याचार करत होता. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे
अशी झाली घटना
वासीम हा गेल्या कित्येक महिन्यापासून अल्पवयीन मुलीला प्रेम करतो म्हणून त्रास देत होता मुलीकडून यास विरोध होता बाहेर फिरायला गेलेल्या मुलीस 13 जानेवारी रोजी चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते त्या नंतर जवळच्या गावात नेऊन सतत आठवडा भर अत्त्याचार केला होता