म्हादई आणि सीमाप्रश्न या विषयावर चर्चा करून पुढील धोरण ठरविण्यासाठी बेळगावात उत्तर कर्नाटकातील मठाधिश एकत्र येणार आहेत.
दि.10 जानेवारी रोजी शिवबसव नगर मधील नागनूर रुद्राक्षी मठात सकाळी 11 वाजत बैठक आयोजित करण्यात आली आहे.म्हादई प्रकरणी लवादाने निकाल दिल्यावर केंद्राने अधिसूचना काढली नाही त्यामुळे चार जिल्ह्यातील भविष्यातील पाण्याची समस्या उद्भवणार आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्राने आक्रमक भूमिका घेतली आहे.म्हादई आणि सीमाप्रश्न याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणण्यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे.
बैठकीला कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंडळींना निमंत्रण नसून केवळ मठाधिश,कन्नड संघटना आणि सामाजिक संघटना याच बैठकीत सहभागी होणार आहेत.