प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने ‘ट्विटर ट्रेंड’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावातील मराठी भाषकांना घटनेने दिलेले मूलभूत अधिकार मिळावेत या जनजागृतीसाठी हा ट्विटर ट्रेंड रविवार दि. 26 जानेवारी 2020 रोजी दिवसभर चालवला जाणार आहे.
मागील वर्षी देखील 1 नोव्हेंबर काळ्या दिनी युवा समितीने असा ट्विटर ट्रेंड हाती घेतला होता. तेंव्हा देशातील 21 हजार लोकांनी सहभाग घेतल्यामुळे युवा समितीचा ट्विटर ट्रेंड तब्बल 4 तास प्रथम क्रमांकावर होता.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली थांबवा,
भारतीय घटनेने दिलेले मूलभूत हक्क आम्हाला आजही मिळत नाहीत. ते मिळविण्यासाठी आम्ही 25 लाख बेळगावकर सीमावासीय अजूनही लढा देत आहोत, हा मुद्दा देशभर पोहचविण्यासाठी खालील हॅश टॅग वापरून, ट्विट करा असे आवाहन केलं आहे. हा आहे हॅश टॅग-
#FightForConstitutionalRight
रविवार दि. २६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०६:०० ते रात्री १० पर्यंत.
‘जरुरी नाही प्रत्येकवेळी रस्त्यावरच उतरलं पाहिजे, ट्विट करून पण सरकारचे लक्ष वेधू शकतो, एक ट्विट बेळगावसह सीमाभागासाठी’ असे घोष वाक्य देखील युवा समितीने तयार केले आहे.