मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रविवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बँकेच्या जुन्या पॅनेलला संपूर्ण पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार शहापूर विभागाने व्यक्त केला आहे.
शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिर येथे शहापूर भागातील पंच मंडळींच्या बैठकीत उपरोक्त निर्धाराचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. प्रारंभी शेखर हंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मराठा बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी परंपरा जपणाऱ्या मराठा बँकेने 77 वर्षे पूर्ण केल्याचे सांगून बँकेच्या भरभराटीत कै. अर्जुनराव घोरपडे, कै. शिवाजीराव काकतकर, कै. अर्जुनराव हिशोबकर या दिवंगत लोकांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. दीपक दळवी यांनी डिजिटल, आरटीजीएस, मोबाईल, एनएफटी अशा सेवा देणारी मराठा को. ऑप. बँक ही राष्ट्रीयीकृत बँकेत बँकेच्या तोडीची असल्याचे गौरवोद्गार काढले. दिगंबर पवार यांनी जुन्या पॅनेलमुळेच बँकेचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत देखील जुन्या पॅनेललाच निवडून आणण्याचे आवाहन केले.
लक्ष्मणराव होनगेकर यांनी मराठा बँक ही सभासदांचा विश्वास आणि आणि सामाजिक बांधिलकी जपणारी तसेच स्वतःचा तब्बल 55 कोटी रुपये इतका राखीव निधी असलेली जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक असल्याचे सांगितले. यावेळी ज्योतिबा तांजी, शिवाजी हंडे, शंकर ढेगोळे, मारुती देवगेकर आदींनी आपले विचार मांडताना जोशी मळा, होसुर, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, बसवान गल्लीसह समस्त शहापूर विभागाचा जुन्या पॅनेललाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीस कल्लाप्पा नाकाडी, विलास लाड, कल्लाप्पा हंडे, बसवंत सैनुचे, जगन्नाथ मेलगे, राजू हंडे, दिलीप पाटील, विकास शिंदे, शिवाजी बाचीकर, सतीश बाचीकर आदींसह शहापूर भागातील पंच मंडळींसह मराठा बँकेचे बहुसंख्य सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते