महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कर्नाटकाचे प्रशासन नरमले असून सिमा भागात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत बेळगाव पोलिसांनी मवाळ भूमिका घेत साहित्य संमेलनाला परवानगी दिली आहे.एकीकडे परवानगी दिली असली तरी संमेलन आयोजकांना कोणतेही भडकाऊ भाषण करू नये अशा जाचक अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या बेळगावातील प्रशासन अधिकाऱ्यावर दूरध्वनीवर चर्चा करून परवानगी द्या अशी मागणी केली होती महाराष्ट्रातील नेते बेळगाव च्या बाबतीत सक्रिय झाल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा दिसलें आहे, कुद्रेमानी आणि ईदलहोंड येथे होणाऱ्या साहित्य संमेलना परवानगी दिली असली तरी पोलिसांनी काही जाचक अटी लादल्या आहेत.
दरम्यान उचगाव जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्या सह शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची भेट घेतली व साहित्य संमेलना बाबत प्रशासनाला भूमिका समजावून सांगितली व कोणत्याही स्थितीत कुद्रेमनीत साहित्य संमेलन घेणार अशी भूमिका स्पष्ट केली.
पोलिसांनी दोन भाषिकांमध्ये निर्माण करू नये कोणतेही भडकाऊ भाषण करू नये, अशा अटी घालून परवानगी देण्यात आली आहे वास्तविक पाहता मराठी साहित्य संमेलन नाही भाषा संस्कृतीची संवर्धन करण्यासाठी आयोजित केली जातात बेळगाव सीमा भागामध्ये नोव्हेंबर ते फेब्रूवारी दरवर्षी दर रविवारी या साहित्य संमेलनाचे आयोजन होत असते कोणताही शासकीय निधी नसताना निव्वळ लोक वर्गणीतून सीमाभागात मराठी साहित्य संमेलनाचा गजर केला जातो कर्नाटक पोलिसांची दडपशाही करून परवानगी नाकारत मराठी माणसाच्या सामान्य मराठी माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सीमाभागातील मराठी जनतेने याचा तीव्र शब्दात निषेध केला होता या विरोधात संतापाची लाट उसळली होती याची दखल महाराष्ट्राच्या नेत्यांनी घेत कर्नाटकाच्या प्रशासनावर दबाव वाढवला त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत अटी लादत शेवटच्या क्षणी परवानगी दिली आहे.
साहित्य संमेलनास लोक कमी जमावे ह्या उद्देशाने परवानगी देण्यास टाळाटाळ सुरू होती आयोजकांच्या वरही दडपशाही केली जात होते आता मात्र हा दडपशाही झुगारत आता हजारोच्या संख्येने मराठी भाषिक साहित्य संमेलनास उपस्थिती लावतील आणि ही दोन्ही संमेलन यशस्वी करून दाखवतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.