बेळगाव तालुक्यातील आराध्यदैवत सुळेभावी येथील महालक्ष्मी आहे.केवळ बेळगावचं नव्हे तर कर्नाटक महाराष्ट्र गोव्यातून लाखो भाविक या देवीच्या दर्शनाला दर अमावस्येला ,मंगळवारी, शुक्रवारी गर्दी करत असतात. यावर्षी देवीचा पंच वार्षिक यात्रोत्सव होणार आहे.
या यात्रोत्सवाचे औचित्य साधून सुळेभावीच्या श्री लक्ष्मी देवीचा महिमा सांगणारा लघुपट काढण्यात आला आहे.’जत्रा आली’ असे या चित्रपटाचे नाव असून देवीच्या मंदिरात या लघुपटाचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
युवा पत्रकार भैरोबा कांबळे यांनी या लघुपटाची कथा,संवाद लिहिले आहेत.लघुचित्रपटात कांबळे यांनी स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे.मुख्य भूमिका मॉडेल आणि स्माईल ऑफ महाराष्ट्र ,खनगावची कन्या स्नेहा पाटील(नागनगौडा)हिने साकारली आहे.
बेळगावच्या एका मराठी मुलीने कन्नड लघुपटात आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.
मराठी भाषिक मुलीकडून कन्नड लघुपटात भूमिका करवून घेण्यासाठी तिच्या कडून खूप सराव करून घेण्यात आला. मुद्दाम हुन सुळेभावीच्या जवळ असलेल्या खनगावच्या कन्येला आम्ही प्राधान्य दिलं आहे तिची या लघुपटात मुख्य भूमिका आहे अशी माहिती भैरोबा कांबळे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
सुळेभावी महालक्ष्मीचा महिमा जागृत कसा आहे,देवावर विश्वास ठेवायला हवा
यावर आधारित लघुपट आहे जवळपास 25 मिनिटांचा लघु पट आहे सुळेभावी,शिरुर डॅम, कल्लाळ ब्रिज, सुळेभावी मन्दिर परिसरात चित्रीकरण पूर्ण झाले आहे.लघुपट युनिट बंगळुरू हुन मागवले होते त्यामुळं हा लघुपट दर्जेदार झालाय असेही ते म्हणाले.
जत्रा आली या लघु पटाचे डायरेक्टर चंदूर मारुती हे दिग्दर्शक आहेत तर कॅमेरा जिवा प्रसन्न (बंगळुरु) यांनी पाहिले.डॉ गजानन नाईक,किरण सिंह राजपूत हे देखील उपस्थित होते.श्री शिवशोभा सिने फॅक्टरी यांच्या वतीने निर्माण करण्यात आले आहे.10 मार्च 18 मार्च 2020 सुळेभावी महालक्ष्मीच्या पंच वार्षिक यात्रे दरम्यान हा लघु पट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे.
खनगावच्या शेतकरी कुटुंबातील मॉडेल कन्येला अभिनय क्षेत्रात ब्रेक देण्यासाठी मराठी मुली कडून कन्नड भाषेत अभिनय करवून घेणाऱ्या लघुपट निर्मात्यांचे कौतुक करायला हवे.