भरधाव जाणाऱ्या दुचाकीची दुभाजकाला धडक बसून तरुण रस्त्यावर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास गांधीनगरमधील मुचंडी गॅरेज समोर ही घटना घडली. यल्लाप्पा विठ्ठल माजोजी (वय 25 राहणार आवरोळी, तालुका खानापूर) असे मृताचे नाव आहे.
सदर तरुण कामानिमित्त हलगामार्गे काकतीकडे निघाला होता. मुचंडी गॅरेज पासून 300 मीटरवर गेल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकीची जोरदार दुभाजकाला धडक बसली.
यामध्ये तो महामार्गावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. वाहतुक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. मृत यल्लाप्पाचा भाऊ श्रीकांत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.