बेळगाव सह सीमा भागामध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलना बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी कानडी संघटनांनी केली आहेसोमवारी सकाळी बेळगाव कन्नड क्रिया समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलीकन्नड क्रिया समितीचे नेते अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वात अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव सह सीमा भागातली मराठी साहित्य संमेलनाला मराठी संस्कृती मराठी वसा जपण्याचा काम गेले कित्येक वर्ष करत आलेले आहेत.समाज रचने नुसार भारतात अस्तित्वात असलेलया कोणत्याही भाषेला बोलण्यासाठी लिहिण्यासाठी भाषण देण्यासाठी तिच्या विस्तारी करणासाठी आणि ती टिकावी म्हणून जे जे साहित्यिक उपक्रम करावे लागतील यांसाठी मज्जाव करता येत नाही.
जगात सातव्या क्रमांकावर असलेली मराठी ही महत्वपूर्ण भाषा आहे तिला जपून तिचे संवर्धन करणे आणि तिच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय गरज आहे अश्या परिस्थितीत कन्नड संघटना घटनानी विरोधी मागणी करून आपल्या अपरिपकवतेचे दर्शन घडवत आहेत कन्नड भाषेत जे विद्वान आहेत जे साहित्यिक आहेत त्यांनी भारतीय भाषा विषयक धोरणाचे आपल्या समाजाला आकलन करून देण्याची गरज आहे.कन्नड संघटनांतील कथा कथित नेते रोज उठून वेगवेगळ्या वलग्ना करतात जिल्हाधिकारी यांचे कडे जाऊन चुकीच्या मागण्या करतात त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे.
एकसंघ भारत टाकायचा असेल तर आपल्या भाषा चालीरीती आणि समाज मन याची जपणूक करणे गरजेचे आहे.शासकीय पातळीवर जे कन्नड नेते चुकीच्या मागण्या करत आहेत त्यांना घटना सांगून त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.