बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बदली रद्द झाली आहे.
गेल्या आठवड्यात 31 डिसेंम्बर रोजी राज्य सरकारने त्यांच्या बदलीचा आदेश दिला होता त्या नंतर त्यांच्या ठिकाणी डी सी पी म्हणून सिमी जॉर्ज यांची नियुक्तीचा आदेश देण्यात आला होता त्या नंतर तो आदेश देखील रद्द करत मिथुन कुमार यांची वर्णी लागली होती आता राज्य सारकरने तो आदेश देखील रद्द केला असून सीमा लाटकर यांनाच पुढे केले आहे.
लाटकर या गेल्या 2 वर्षे पाच महिन्या पासून कायदा सुव्यवस्था विभागाच्या डी सी म्हणून काम करत आहेत आपल्या कार्य काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत आता त्या पुन्हा पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असतील.