मेटल अर्थात धातू, सिरामिक्स, पॉलीमर्स, आणि कॉम्पोझिट पावडर मटेरियल्ससाठीचे प्रोसेसिंग फर्नेस असलेले देशातील पहिले ‘ बाईंडर जेट प्रिंटर’ बेळगावात तयार करण्यात आले आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रानेही ही बाब बेळगावसाठी भूषण असल्याचे म्हंटले आहे. एनर्जी मायक्रोव्हेवसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड (ईएमएसपीएल) ही ती बेळगावची कंपनी आहे जीने सदर बाईंडर जेट 3d प्रिंटर बनविला आहे.
‘ईएमएसपीएल’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार या बाईंडर जेट प्रिंटर्ससह त्यांची कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण आधुनिक साहित्य निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नातूनच आता ‘ईनप्रिंट अल्फा’ प्रकारचे बाईंडर जेट थ्रीडी प्रिंटर विकसित करण्याची योजना आहे. ‘ईएमएसपीएल’ने तयार केलेले बाइंडर जेट प्रिंटर हे आधुनिक मायक्रोवेव्ह असिस्टेड हाय टेम्परेचर फर्नसने सुसज्ज आहे.
आपल्या कंपनीमध्ये या बाईंडर जेट थ्रीडी प्रिंटरचा सध्या स्टील पावडरचे प्रोसेसिंग करण्यासाठी वापर केला जात आहे. मात्र लवकरच टिट्यानियमसह सिरामिक पॉलीमर्स, कॉम्पोझिट पावडर्स आदींसाठी हे प्रिंटर वापरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या मशिनद्वारे सध्या 180 × 180 × 180 मि. मी.चे प्रिंट आणि सेंटर पार्ट उपलब्ध होऊ शकतात. लवकरच या मशीनचे मोठ्या मशीन मध्ये रुपांतर केले जाईल असेही प्रकाश मूगळी यांनी सांगितले.
‘इनप्रिंट अल्फा’ हे भारतीय बाजारपेठेत जुलैमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगून आपले उत्पादन अधिक प्रगतशील व दर्जेदार व्हावे यासाठी एनर्जी मायक्रोव्हेवसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड देश-विदेशातील संशोधन केंद्रे आणि विद्यापीठांच्या संपर्कात आहे असे प्रकाश मुगळी यांनी स्पष्ट केले. आपल्या कंपनीने 2019 मध्ये इंडिया स्टॉप एसएमई इनोव्हेटर हा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच इंडिया एसएमई 100 अवॉर्ड, इकॉनोमिक टाइम्सचा एसआयडीबीआय-ईटी इंडियास मोस्ट टेक्-सेव्ही कंपनी ऑफ द इयर 2018 पुरस्कार, 2017 मध्ये कर्नाटक सरकारचा मॅन्युफॅक्चरिंग एक्सैलेन्सी अवॉर्ड, 2015 मध्ये नॅशनल प्रॉडक्टव्हीटी कौन्सिल ऑफ इंडियाचा नॅशनल इनोव्हेशन अवॉर्ड, तसेच रोटरी इंटरनॅशनलचा आरयुएसआय 2011 पुरस्कार आपल्या कंपनीने प्राप्त केला असल्याचेही प्रकाश मुगळी यांनी सांगितले.