तणाव कमी करण्यासाठी स्नेहपूर्ण संबंध वाढवले पाहिजेत असा सल्ला राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी पोलिसांना दिला.
बुधवारी बेळगाव येथील जेएनएमसी सभागृहात पोलिसांसाठी एक दिवसाची प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्याचे उद्घाटन करून गृहमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. एम बी जिरली, उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी राघवेंद्र सुहास, बेळगावचे पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होते.
गृहमंत्री बोम्माई म्हणाले, पोलीस काम करणे आजकाल सोपे राहिलेले नाही. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून इतरांची भांडणे सोडवणे यातच पोलिसांचा बराच वेळ खर्ची पडतो. पोलीस खात्यात आव्हानात्मक काम आहे, हे माहिती असूनही तुम्ही पोलीस दलात सामील झाला आहात. त्यामुळे आता हेच तुमचे जीवन बनले असून ते आनंददायी व तणावरहित जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तणाव सकारात्मक दृष्टीने घेतल्यास तो निश्चितच कमी होऊ शकतो, असा मोलाचा सल्ला देत पोलिसांना तणाव शेअर करता आला पाहिजे तणाव एन्जॉय करण्याची कलाही पोलीस अधिकारी व अन्य पोलिसांनी अवगत करायला हवी, जर तणाव हा सकारात्मक विचाराने घेतला तर तो निश्चितच कमी होऊ शकतो. स्वतःकडे असेही त्यांनी सांगितले.