कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून बेळगाव जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी त्या होणार तशी अधिसूचना जाहीर झाल्याच्या वृत्ताचे राज्य निवडणुक आयोगाने खंडन केले आहे. तसेच 5 व 9 एप्रिल 2020 रोजी कोणत्याही ग्रामपंचायत निवडणुका होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.
ग्राम पंचायत सदस्य निवडणूक लढवण्यास कोणतीही शिक्षणाची अट नाही दहावी पर्यंत शिक्षण जरुरी ही अट नाही असाही खुलासा राज्य निवडणूक आयोगाने पत्रक काढून केला आहे.
आज शनिवार सकाळपासून राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्या असून दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील निवडणुका 9 एप्रिलला होतील. अशा प्रकारचे वृत्त सोशल मीडियावर फिरत होते. परिणामी दिवसभर सर्वत्र या वृत्ताची चर्चा होत होती. तथापि याबाबतची माहिती मिळताच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात खुलासा करताना सदर ग्रामपंचायत निवडणुकांचे वृत्त निखालस खोटे असल्याचे जाहीर केले आहे. अशाप्रकारे 5 व 9 एप्रिलला कोणत्याही ग्रामपंचायत निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अधीसूचने बाबतच्या चर्चेवर पडदा पडला आहे.