शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून या मोकाट कुत्र्यांनी शहर परिसरात अक्षरशः हैदोस घातला आहे.मंगळवारी रात्री या मोकाट कुत्र्यांनी
उज्वल नगर ,गांधीनगर आणि मन्नत कॉलनी येथे तीन मुलांचा चावा घेतला आहे.कुत्र्यांनी घेतलेल्यां चाव्यामुळे ही तीन मुले जखमी झाली आहेत.
मोकाट कुत्र्याबाबत जखमी झालेल्या मुलांचे पालक महानगरपालिकेत गेले तर तेथील बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी कुत्री पकडायचे आणि नसबंदी करायचे टेंडर संपलेलं आहे असे सरकारी पठडीतले उत्तर दिले.त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही असेही त्यांनी उद्धट पणाचे उत्तर दिले.
शनवाझ इनशनदार(3),फैझान(5) आणि आदीबा सय्यद (11) अशी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत.रेबीज लसही सरकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे कळते.त्यामुळे उपचारासाठी खासगी दवाखान्याचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागणार आहे.
शहरात अनेक ठिकाणी आठ दहा कुत्री घोळका करून थांबलेली असतात. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना भुंकणे, अंगावर जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.